पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसाला अटक
विसापूर (जिल्हा पुणे) – मावळ तालुक्यातील विसापूर गड परिसरामध्ये ५ वर्षाच्या मुलीवर सचिन सस्ते या पोलीस कर्मचार्याने लैंगिक अत्याचार केले. (अशा वासनांध पोलिसाला फाशीची शिक्षा द्यायला हवी ! – संपादक) विसापूर गड परिसरामध्ये २५ डिसेंबर या दिवशी बंदोबस्तांवर असलेल्या सचिनने पीडित मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून अतीप्रसंग केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सचिनला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते यांचा समावेश होता. तेथे पीडित मुलगी खेळत असतांना तिला चॉकलेटचे आमीष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.
संपादकीय भूमिका
|