नवी मुंबई – जुईनगर येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सेक्टर-२५ येथील गणेश मैदानात चालू असलेल्या या सप्ताहाची सांगता देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवार, २९ डिसेंबर या दिवशी होणार आहे. ह.भ.प. विशाल महाराज खोले, शंकर महाराज शेवाळे, लक्ष्मण महाराज पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. २८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता भव्य ग्रंथ दिंडी सोहळा होणार आहे. माजी नगरसेवक रंगनाथ औटी, संस्थेचे अध्यक्ष जालींदर औटी, सचिव मच्छिंद्र रोडे त्यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी हा सप्ताह साजरा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.