देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत. वर्तुळाकारात फुले वाहतांना वर्तुळाचा मधील भाग फुलांनी भरलेला म्हणजे भरीव नसावा. देवीला अत्तर वहातांना ‘मोगरा’ या गंधाचे अत्तर वहावे.
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाचे शास्त्र’)