देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे. देवीला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणांवर वाहावे. अंगठा आणि अनामिका जोडल्याने होणार्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे पूजकामध्ये भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाचे शास्त्र’)