निवडणुकीत समर्थन मिळण्यासाठी पीडीपीच्या नेत्याने हिजबूल मुजाहिदीनला दिले होते १० लाख रुपये !

पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?

पीडीपी चे वहीद उर रहमान पारा आणि निलंबित पोलीस अधीक्षक दविंदर सिंह

श्रीनगर – ‘जम्मू-कश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी’चे नेते वहीद उर रहमान पारा यांनी वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना समर्थन मिळावे, यासाठी हिजबुल-मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेला १० लाख रुपये दिल्याचे राष्ट्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे.

पारा यांना नोव्हेंबर मासात अटक करण्यात आली होती. निलंबित पोलीस अधीक्षक दविंदर सिंह याचे हिजबुलशी सलेल्या संबंधांची चौकशी करतांना पारा यांच्या या संघटनेशी असलेल्या संबंधांची माहिती मिळाली.

 (सौजन्य : CAPITAL TV)