Prayagraj Mahakumbha Parva 2025 : ‘डरेंगे तो मरेंगे’ हा फलक ठरत आहे चर्चेचा विषय !

प्रयागराज महाकुंभपर्व २०२५

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) : प्रयागराज महाकुंभपर्वाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक साधू, संत, महंत आदी कुंभक्षेत्री येत आहेत. अनेक संतांच्या कथा, प्रवचन आदींचे फलक कुंभक्षेत्री लागले आहेत. अशातच महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचेही मोठ्या आकारातील ३ फलक त्रिवेणी मार्गाजवळी ‘खोया-पाया केंद्रा’समोर लागले आहेत. यांतील एका फलकावर ‘सनातन सात्त्विक है, पर कायर नहीं’ (सनातन सात्त्विक आहे; पण घाबरट नाही), तर दुसर्‍या फलकावर ‘डरेंगे तो मरेंगे’ (घाबरलो, तर मरू), ‘वक्फ के नाम पर संपत्ती की लूट है । धर्मनिरपेक्ष देश में ये कैसी छूट है ।’ (वक्फच्या नावावर संपत्तीची लूट चालली आहे. धर्मनिरपेक्ष देशा ही सूच कशी दिली जात आहे ?) असे वाक्य लिहिण्यात आले आहे. यांतील ‘डरेंगे तो मरेंगे’ हा फलक लक्षवेधी ठरत असून कुंभक्षेत्री चर्चेचा विषय बनला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे ।’ (विभाजित होऊन राहिलो, तर कापले जाऊ) ही दिलेली घोषणा चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्याच आधारावर ‘डरेंगे तो मरेंगे’ ही घोषणा केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.