Akhada Parishad On Pannu’s Threat : महाकुंभ मेळ्याला येण्याचे धाडस केले, तर चोप देऊन पळवून लावू !

  • आखाडा परिषदेची अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याला चेतावणी

  • खलिस्तानी आतंकवाद्यांना ठार मारल्याचा सूड महाकुंभ मेळ्यात घेण्याची पन्नूने दिली आहे धमकी !

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी व खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने नुकताच एक व्हिडिओ प्रसारित करून ‘महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानांच्या दिवशी पिलीभीत येथे ठार झालेल्या खलिस्तान्यांच्या मृत्यूचा सूड घेतला जाईल’, अशी धमकी दिली आहे. यावर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, अशा वेड्यांना आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही.

जर पन्नू नावाच्या व्यक्तीने आमच्या महाकुंभात जाण्याचे धाडस केले, तर त्याला चोप देऊन पळवून लावले जाईल.

ते पुढे म्हणाले की, हा माघ मेळा आहे, जिथे शीख आणि हिंदू सर्व एक आहेत. पन्नूने आमच्यात फूट पाडण्याचे जे म्हटले, ते योग्य नाही. विभाजनाला चालना देण्याचा पन्नूचा प्रयत्न निराधार आहे. नागा साधूंप्रमाणे शीख समाजातही साधू आहेत. हे दोघे समान आहेत. हे सनातनचे सैनिक आहेत.