तीव्र शारीरिक त्रास असूनही गुरूंप्रती असलेल्या अपार भावामुळे धानोरा (जिल्हा बीड) येथील श्री. महादेव गायकवाड (वय ८२ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !
अखंड नामस्मरण करणारे आणि वारकरी संप्रदायानुसार साधना करणारे धानोरा येथील श्री. महादेव गायकवाड (वय ८२ वर्षे) यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांनी दिली. २४ मार्च २०२५ या दिवशी धानोरा येथील गायकवाड वस्तीवर आयोजित एका अनौपचारिक सत्संगात पू. दीपाली मतकर यांनी श्री. गायकवाड यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता दिली.