CM Yogi On Veer Bal Diwas : भारताला काबुल (अफगाणिस्तान) आणि बांगलादेश होण्यापासून वाचवायचे आहे ! – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आज काबुलमध्ये  केवळ ८ ते १० शीख कुटुंबे उरली आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश येथील घटना पाहिल्या की, शीख गुरूंनी केलेला त्याग आणि बलीदान यांची आठवण होते. शीख गुरूंनी आपल्यासमोर ठेवलेले आदर्श आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलो, तर काबुल आणि बांगलादेश यांसारख्या परिस्थिती टाळता येतील, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.

ते शिखांचे नववे गुरु गोविंददेव सिंह यांचे २ सुपुत्रांच्या त्यागाच्या निमित्त आयोजित ‘वीर बाल दिना’निमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.