पणजी – सत्तरी हा उत्तर गोव्यातील शेवटचा ग्रामीण तालुका ! काजू, सुपारी, नारळ, केळी, आंबा अशी शेती उत्पादने येथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या उत्पादनांमध्ये आता स्ट्रॉबेरीचीही भर पडली आहे. सत्तरीतील युवा प्रगतशील शेतकरी श्याम गावकर यांनी म्हादई अभयारण्यातील साट्रे गावात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.
‘‘स्ट्रॉबेरीची लागवड कशा प्रकारे केली जाते’, हे दाखवण्यासाठी वाळपई विभागीय कृषी कार्यालयाने सत्तरीतील २५ शेतकर्यांना महाबळेश्वर येथे नेले होते. त्या वेळी मी घरी येतांना स्ट्रॉबेरीची रोपे आणली होती. नोव्हेंबर मासाच्या दुसर्या आठवड्यात ३ सहस्र चौरस मीटर जागेत स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. झाडे लावल्यापासून आता दीड महिन्यातच स्ट्रॉबेरीचे पीक येण्यास आरंभ झाला’, असे गावकर यांनी सांगितले.