काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे श्री हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान
|
बेंगळुरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या २ डिसेंबर या दिवशी त्यांच्या मूळ घरी गेले होते. ते मांसाहार करत होते. गावकर्यांपैकी एकाने त्यांना ‘आज हनुमान जयंती आहे’, याची आठवण करून दिली. त्यावर सिद्धरामय्या यांनी त्या गावकर्याला, ‘तुला हनुमानाचा जन्मदिनांक ठाऊक आहे का ? ठाऊक असेल, तरच जयंती साजरी कर, नाहीतर केवळ कोंबडी खा’, असे आक्षेपार्ह उत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओ आता सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यावर राज्याचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी ट्वीट करून लिहिले, ‘सिद्धरामय्या यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्या देवतांच्या श्रद्धेचा अवमान करणे म्हणजे ‘धर्मनिरपेक्षता’ आहे, अशी त्यांची समजूत आहे.’
सिद्धरामय्या यांनी गोवंशियांचे मांस खात असल्याचीही दिली आहे स्वीकृती !
कर्नाटक के पूर्व CM सिद्धारमैया ने स्वीकारा कि वे ‘मवेशियों का माँस’ खाते हैं, कॉन्ग्रेस स्थापना दिवस समारोह पर बयान https://t.co/B8zoHP2Bk6 @Ajal_3
— सी. एम. पाण्डेय (@C_M_P17) December 30, 2020
सिद्धरामय्या यांनी २८ डिसेंबरला विधानसभेत गोहत्या बंदीच्या विधेयकावर चर्चा करतांना म्हटले होते की, मी यापूर्वी विधानसभेत सांगितले आहे की, मी गोवंशियांचे मांस खातो. तुम्ही मला याविषयी विचारणारे कोण आहात ? तुम्ही खात नाही, हा तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला प्रवृत्तही करत नाही. मी खातो आणि मला ते आवडते. हा माझा अधिकार आहे. (कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी बहुसंख्य धार्मिक हिंदूंच्या मतांवर निवडून येऊन अशा प्रकारचे विधान करणे, हे त्यांना निवडून देणार्या हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)
(म्हणे) ‘हनुमान गुलामगिरीचा दर्शक आहे !’ – मैसुरू विश्वविद्यालयाचे निवृत्त प्रा. डॉ. बी.जी. महेश
प्रा. महेश यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनात किती हिंदुद्वेष भरवला असणार, याची यातून कल्पना येते ! हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून राज्यातील भाजप सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !
म्हैसुरू (कर्नाटक) – राम हा प्रभुत्वाचा दर्शक असेल, तर हनुमान हा गुलामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. संघ परिवारवाले हनुमान जयंतीच्या माध्यमातून अशी संस्कृती मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी निघाले आहेत, असा आरोप म्हैसुरू विश्वविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. बी.पी. महेश चंद्रगुरु यांनी केला आहे. ते सिद्धरामय्या यांच्या विधानावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते.