नवी देहली – अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अभ्यासानुसार वर्ष २०५० पर्यंत हिंदू जगातील तिसर्या क्रमांकाची लोकसंख्या बनतील. तोपर्यंत भारतातील हिंदु लोकसंख्या १३० कोटी होईल. भारतात प्रत्येक ४ लोकांपैकी ३ लोक हिंदू असतील. (याचा अर्थ पुढील २५ वर्षांत भारतात हिंदूंच्या लोकसंख्येची टक्केवारी जवळपास ५ टक्क्यांनी उणावणार आहे, तर मुसलमानांची तेवढ्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता दाट आहे. यातून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते ! – संपादक) वर्ष २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येमध्ये हिंदूंचा एकूण वाटा १४.९ टक्के असेल. यानंतर १३.२ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेले लोक असतील. त्या कालावधीपर्यंत संपूर्ण जगात हिंदूंची लोकसंख्या ३४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. या अहवालात सध्या तिसर्या क्रमांकावर कोणत्या विचारसरणीचे अथवा पंथाचे लोक आहेत, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
वर्ष २०५० मध्ये भारत जगातील सर्वाधिक मुसलमान असणारा देश बनणार !
मुसलमानांमधील उच्च प्रजनन प्रमाण, तसेच सर्वांत तरुणवर्ग असल्यामुळे या कालावधीत भारत इंडोनेशियाला मागे टाकून सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश बनेल. भारतातील मुसलमानांची लोकसंख्या ३१.१ कोटी असेल, जी संपूर्ण जगातील मुसलमानांच्या ११ टक्के असेल. (देशात इतके मुसलमान झाल्यावर भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी ते उठाव करतील किंवा भारताच्या आणखी एका फाळणीची मागणी करतील ! – संपादक) याचा अर्थ भारत हा इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि नायजेरिया या मुसलमानांची मोठी लोकसंख्या असलेल्या इस्लामी देशांना मागे टाकेल.
ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प होणार !
भारतातील ख्रिस्ती लोकसंख्या सध्या एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के आहे. वर्ष २०५० पर्यंत ती २.३ टक्क्यांपर्यंत अल्प होण्याची शक्यता आहे.
शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक स्तरावर मुसलमान लोकसंख्येत सर्वाधिक असणार !
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार इस्लाम जगातील सर्वांत वेगाने वाढणारा धार्मिक गट आहे. लोकसंख्येचा हा कल असाच चालू राहिला, तर या शतकाच्या अखेरीस मुसलमान लोकसंख्या ख्रिस्त्यांच्या संख्येपेक्षा अधिक होईल. वर्ष २०१० पर्यंत जगात १६० कोटी मुसलमान होते. वर्ष २०५० पर्यंत ही लोकसंख्या २८० कोटी होईल. आशिया पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक ७२ टक्के मुसलमान लोक रहातात. वर्ष २०५० पर्यंत मुसलमान लोकसंख्या एकूण युरोपियन लोकसंख्येच्या १० टक्के असेल. तर वर्ष २१०० पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या जगात सर्वाधिक असेल.