केंद्र सरकारची ३ कृषी कायदे केरळमध्ये लागू न करण्याचा ठराव विधानसभेत संमत

मतदानाला भाजपचा एकमेव आमदार अनुपस्थित : ठरावाला पाठिंबा

केरळ विधानसभI

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केंद्र सरकारने केलेले ३ कृषी कायदे राज्यात लागू न करण्याविषयीचा ठराव केरळ राज्याच्या विधानसभेने संमत केला. विशेष म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष असणार्‍या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटसमवेत भाजपचे एकमेव आमदार ओ राजगोपाल यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला.

राजगोपाल यांनी या ठरावाला चर्चेच्या वेळी विरोध दर्शवला होता; मात्र मतदानाच्या वेळी ते अनुपस्थित राहिले. त्यांची अनुपस्थिती हाच या ठरावाला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.