महंमद अफझल आणि मकबूल भट यांचे अवशेष त्यांच्या कुटुंबियांना द्यावेत ! –  पीडीपीच्या खासदाराची मागणी

काश्मीरमधील पीडीपीचे खासदार महंमद फैयाज मीर यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून, संसदेवरील आक्रमणातील सूत्रधार असणार्‍या आणि फाशी देण्यात आलेला आतंकवादी महंमद अफझल, तसेच वर्ष १९८४ मध्ये फाशी देण्यात आलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक सदस्य मकबूल भट…

(म्हणे) ‘बुरहान वानी याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते !’ – मेहबूबा मुफ्ती यांचे देशद्रोही विधान

हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी मारला गेला; पण त्याचे (देशद्रोही आणि विखारी) विचार आजही काश्मीर खोर्‍यात जिवंत आहेत. त्यामुळे त्याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले.

अभद्र युतीला आळा !

राज्यपालांच्या विधानसभा विसर्जित करण्याच्या निर्णयानंतर तेथे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. तेथे घडलेल्या राजकीय घडोमोडीही तशाच आहेत.

(म्हणे) ‘आतंकवादी मन्नान वानी हिंसाचारातील पीडित !’ – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमध्ये मन्नान वानी या आतंकवाद्याला भारतीय सुरक्षादलाने ठार केले. या पार्श्‍वभूमीवर पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंटच्या नेत्या आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी वानी हा काश्मीरमधील हिंसाचारातील पीडित असल्याचे वक्तव्य केले आहे

(म्हणे) ‘आतंकवाद्यांच्या कुटुंबियांचा छळ न थांबल्यास गंभीर परिणाम होतील !’ – पीडीपीचे आमदार मुश्ताक अहमद शाह

आतंकवाद्यांच्या कुटुंबियांना चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात येत आहे. हे सहन केले जाणार नाही. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चेतावणी पीडीपीचे आमदार मुश्ताक अहमद शाह यांनी राज्यपालांना दिली आहे.

आतंकवादीप्रेमाचा  ‘मुफ्ती’ वारसा !

विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकाटिप्पणी करणे, ही काही नवीन गोष्ट नाही. सत्ताधारी पक्षाचे एखादे सूत्र न पटल्यास ‘आम्ही या विरोधात आंदोलन छेडू’, ‘कार्यकर्त्यांच्या उद्रेकास सत्ताधारी पक्ष उत्तरदायी असेल’, ‘सत्ताधार्‍यांना वाईट परिणाम भोगावे लागतील’, अशा प्रकारच्या धमक्या वजा सूचना देण्याचे प्रकार लोकशाहीत होतच असतात.

पीडीपी आणि भाजप सरकारच्या ३ वर्षांच्या काळात २५२ सैनिक हुतात्मा

हिंसाचार आणि आतंकवाद वाढल्याचे कारण देत भाजपने जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सोबतच्या सरकारमधून बाहेर पडल्याचे सांगितले. या दोघांचे सरकार ३ वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेवर होते. या काळात राज्यात दगडफेकीच्या ४ सहस्र ७९९ घटना झाल्या.

भाजप-पीडीपी युतीची फलनिष्पत्ती !

भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी (पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी) या धर्मांध पक्षाला दिलेला पाठिंबा काढून घेतला. यामुळे सरकार कोसळून तेथे सध्या राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर

जम्मू-काश्मीरमधील पीडीपी आणि भाजप यांच्या सरकारमधील भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांकडे त्यागपत्र दिले आहे. युती करण्यामागचे जे उद्देश होते, ते पूर्ण न झाल्याने ……

शरण येणार्‍या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीर सरकार आता ६ लाख रुपये देणार !

जम्मू-काश्मीर सरकारने शरण येणार्‍या आतंकवाद्यांच्या, तसेच त्यांच्या पुनर्वसनाच्या धोरणात पालट करण्याचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. यात शरण येणार्‍या आतंकवाद्यांना मिळणारा साहायता निधी…..

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now