राज्यांनी दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय ठेवावा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
आज नवरात्रीचा शेवटचा दिवस. उद्या रामनवमी आहे. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. त्यामुळे तुम्हीही मर्यादांचे पालन करावे, हाच श्रीरामाचा संदेश आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिलच्या रात्री देशवासियांना दिला.