श्रद्धेचा आरंभ !
बुद्धीचे कार्य संपले-थांबले, म्हणजे श्रद्धेचे आरंभते. बुद्धीने श्रद्धेचे आसन मांडून ठेवावे; पण आपणच त्यावर बसू नये.
बुद्धीचे कार्य संपले-थांबले, म्हणजे श्रद्धेचे आरंभते. बुद्धीने श्रद्धेचे आसन मांडून ठेवावे; पण आपणच त्यावर बसू नये.
सर्व क्रियांमध्ये भगवंत पहाणे, म्हणजे ‘क्रियायोग’ होय. ‘सर्व क्रिया भगवंताच्याच आहेत’, असा दृढनिश्चय झाला म्हणजे ‘क्रियायोग’ साधला. भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही.
‘सर्वसाधारण व्यक्ती बुद्धिनिष्ठ असते. ती ‘मला वाटते, तेच खरे’ अथवा ‘मला ‘हे’, ‘ते’ सर्वच कमवायचे आहे’, या विचारसरणीची असते, तर साधक ‘मला सर्व गोष्टींचा त्याग करून पुष्कळ शिकायचे आहे’, या विचारसरणीचा असतो.’
‘ज्याची भगवंतावर श्रद्धा असते, त्याचा पैशावर विश्वास नसतो.
‘अध्यात्मशास्त्रा’मध्ये ईश्वर, आत्मा यांसारख्या विषयांच्या संदर्भात तात्त्विक ज्ञान असते, तर ‘साधना’ म्हणजे मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग करून स्वस्वरूपाची ओळख करणे अथवा ईश्वरप्राप्ती करणे होय.
कार्य करण्यासाठी पुढच्या पुढच्या पिढ्याही तयार होतील. त्यामुळे त्याची काळजी करू नये. प्रथम स्वतः अधिकाधिक चांगले साधक होण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मार्गदर्शन करणार्या साधकांची मदत घ्या.
एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही.
कमलपत्र २४ घंटे पाण्यात असते; पण कधी कुजत नाही. त्याच्यावर पाण्याच्या थेंब टाकला, तर मोती ठेवल्यासारखे वाटते. पाणी चिकटत नाही; म्हणून पाण्याचा मोती होतो. सत्कर्माचा मोती व्हावयाचा असेल, तर ते अहंकार आणि आसक्ती यांना चिकटता कामा नये.
मनुष्याला खर्या सुख-दुःखाचे ज्ञान नसते. तो ‘आपल्या मनाप्रमाणे होणे म्हणजे सुख’ आणि ‘मनाविरुद्ध होणे म्हणजे दुःख’, असे समजतो.