नंदुरबारमधील कुपोषण आणि बालमृत्‍यू यांना राज्‍य सरकार उत्तरदायी ! – आमदार आमश्‍या पाडवी

स्‍वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्‍या सर्व शासनकर्त्‍यांना हा प्रश्‍न सोडवता न येणे लज्‍जास्‍पद आहे. सरकारने आता तरी ही समस्‍या संपवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित मुलांची समस्या कायम

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८९३ बालके अल्प वजनाची, तर ५९ बालके तीव्र अल्प वजनाची असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील मेपर्यंत ९०४ बालके कुपोषणमुक्त करण्यात यश !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बालके कुपोषित असणे, दुर्दैवी आणि गंभीर आहे. प्रशासनाने ‘एकही बालक कुपोषित नको’, असे ध्येय घेणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील १६ आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणामुळे ५ वर्षांत ८ सहस्र ८४२ बालमृत्यू !

सरकारकडून विविध योजना चालू करण्यात येऊनही आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद करूनही कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असेल, तर हा निधी नक्की जातो कुठे ? या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी !

पुणे जिल्ह्यात १ सहस्र २८९ बालके मध्यम कुपोषित आणि ३७१ बालके अतीतीव्र कुपोषित !

एका पुणे जिल्ह्यात सहस्रो बालके कुपोषित असणे चिंताजनक आहे. ही महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ? बालक म्हणजे देशाची भावी पिढी, हे लक्षात घेऊन कुपोषित बालकांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

मुंबईत ४ सहस्र १९४ तीव्र कुपोषित बालके !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या तीव्र असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

भूक शमवण्यासाठी !

जागतिक भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी आहे, हे भारताने फेटाळले आहे. ‘दूरभाषद्वारे विचारलेल्या ४ प्रश्नांच्या आधारे हे ठरवू शकत नाही’, असे म्हणून भारत सरकारने हा अहवाल नाकारला आहे.

भूक निर्देशांक ठरवण्याची पद्धत अशास्त्रीय असून तो निश्‍चित करण्याच्या कार्यपद्धतीत अनेक गंभीर चुका ! – भारताने निर्देशांक नाकारला !

जर भारताला जाणीवपूर्वक अशा निर्देशांकाद्वारे जागतिक स्तरावर अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर भारताने प्रखर विरोध करून निर्देशांक फेटाळलेच पाहिजे !

कुपोषणाची समस्या कधी संपणार ?

ज्या बालकांच्या जोरावर आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पहात आहोत, तेच बालक जर अशक्त असेल, तर आपण जागतिक महासत्ता कसे होणार ? त्यामुळे देशातून कुपोषण कायमचे हद्दपार होण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात !

आरोग्याला हानीकारक ‘जंक फूड’च्या आहारी न जाता स्वदेशी अन्न ग्रहण करून निरोगी रहा ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने ‘राष्ट्रीय चिकित्सक दिना’निमित्त ‘विदेशी जंक फूड – पोषण कि आर्थिक शोषण ?’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन