पू. संदीप आळशी यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसंदर्भात साधिकेला केलेले अनमोल मार्गदर्शन !

एकदा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात दुपारचा महाप्रसाद पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांच्या समवेत घेत होते. तेव्हा त्यांनी माझ्या चेहर्‍याकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांचे माझ्याशी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग चालू असतांना खोलीत सूक्ष्म गंध येण्‍याच्‍या संदर्भात प्रयोग केल्‍यावर संत आणि साधिका यांना जाणवलेली सूत्रे

‘प्रयोग करायला सांगितल्‍यावर मला प्रत्‍येक श्‍वासागणिक वेगवेगळा सुगंध आला.-सौ. अवनी संदीप आळशी

संतांकडे बहिर्मुख दृष्‍टीने नव्‍हे, तर अंतर्मुख दृष्‍टीने पहा !

‘संतसहवास मिळायला पुष्‍कळ भाग्‍य लाभते. साधकांनी संतांकडे अंतर्मुख दृष्‍टीने पाहिल्‍यासच त्‍यांना संतांमधील देवत्‍वाचा खरा लाभ होतो. ‘संतांचा सहवास लाभल्‍यावर त्‍यांच्‍यातील चैतन्‍याचा लाभ होण्‍यासाठी प्रार्थना करणे, ‘संत जे काही सांगतात ते आपल्‍या कल्‍याणासाठीच आहे’…

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे. 

भावाच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘साधक, भक्त आणि संत यांचे आपल्याकडून नकळत जरी मन दुखावले गेले, तर देव आपल्याला स्वीकारत नाही. देवाला त्याच्यावर प्रेम करणार्‍यापेक्षा त्याच्या भक्तांवर किंवा साधकांवर प्रेम करणारा अधिक प्रिय असतो.

रात्री झोपण्‍यापूर्वी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय आवर्जून करणे आवश्‍यक !

‘सध्‍याच्‍या आपत्‍काळात वाईट शक्‍तींचे त्रास पुष्‍कळ वाढले आहेत. त्‍यामुळे बहुतांशी साधकांवर दिवसभर मधे मधे काळे (त्रासदायक) आवरण येत असते. साधकांनी मधे मधे ते काढत रहावे. रात्री झोपायला जाण्‍यापूर्वी आवरण न काढल्‍यास रात्रभर आवरणयुक्‍त राहिल्‍याने वाईट शक्‍तींचे आक्रमण अधिक होण्‍याची शक्‍यता असते.

साधकांनी सेवा करतांना प्रति  १-२ घंट्यांनी (तासांनी) व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक ! 

साधकांनी शक्यतो प्रति १ – २ घंट्यांनी चालू असलेली सेवा किंवा वैयक्तिक कामे थांबवून पुढील प्रयत्न क्रमाने करावेत. २ – ३ मिनिटे आवरण काढणे, प्रार्थना करणे, अर्ध्या मिनिटासाठी एखादा भावप्रयोग करणे, एखादी स्वयंसूचना देणे.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींना पाहिल्यावर साधक आणि संत यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘‘मला ओंकार ऐकू आला. ‘पू. दातेआजी आपल्या बोलण्याला प्रतिसाद देत आहेत’, असे वाटते. ‘पू. आजींच्या गालावर चमक आहे’, असे वाटते.’’

‘मनमोकळेपणाने बोलणे’, याविषयी साधिकेला सुचलेले काही आध्यात्मिक दृष्टीकोन !

‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण यांच्या माध्यमातून गुरुदेवच मार्गदर्शन करत आहेत’, असा भाव ठेवून ऐकले, तर प्रयत्न करणे सोपे होते आणि संघर्षाची तीव्रता न्यून होऊ लागते.

श्री लक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नमन !

माता ना तू जगज्‍जननी ।
आम्‍हा साधकांची तू मनोदेवी ॥ १ ॥