भक्तशिरोमणी संकटमोचन हनुमानाची विविध गुणवैशिष्ट्ये !
हनुमंत भगवंताचा परम भक्त होता; त्यामुळे त्याच्यामध्ये लेशमात्रही अहंकार नव्हता. हनुमंतासारख्या अहंशून्य भक्ताच्या माध्यमातून, भगवंताने श्रीरामावतारात रावण, इंद्रजीत, अहिरावण, महिरावण इत्यादी मोठ्या असुरांचे गर्वहरण केले होते.