‘काही वेळा वार्‍याचा जोर पुष्कळ असूनही झाडाच्या फांद्या न तुटणे, तुटणे किंवा वृक्ष उन्मळून पडणे’, यांमागील सूक्ष्मातील प्रक्रिया !

गर्भलहरींद्वारे भूमीतील तेजतत्त्व केशलहरींना, म्हणजेच त्या वृक्षाला वेगाने प्राप्त होते. त्यामुळे वृक्षाचे भूमीला घट्ट धरून ठेवण्याचे बळ वाढते; परिणामी जोराचा वारा वाहिला, तरी वृक्षाच्या फांद्या तुटत नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सूक्ष्म-जगताच्या संदर्भात साधकाला शिकायला मिळालेले विविध पैलू !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या प्रश्नांची सूक्ष्मातून उत्तरे देणे’, या सेवेतून सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होण्याचा एक पैलू समजला; परंतु ‘त्याला अनेक पैलू असतात’, हे पुढील प्रसंगांतून लक्षात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक कलाकार  निर्माण करत असलेल्या सात्त्विक कलेचे समष्टीसाठी असलेले महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कला ज्ञात असलेले साधक भावभक्तीने साधना करून सात्त्विक कलांची निर्मिती करत आहेत.

उत्तरेकडील क्षितिजाकडे पाहिल्यावर जडपणा जाणवतो, तर ईशान्येकडील क्षितिजाकडे पाहिल्यावर हलकेपणा जाणवण्यामागील कारणे

सूर्यप्रकाशाचे अस्तित्व पुष्कळ प्रमाणात असल्याने ईशान्य दिशेला ईश्वरी चैतन्य अधिक प्रमाणात असते. त्यामुळे ईशान्येकडील क्षितिजाकडे पाहून हलकेपणा जाणवतो.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भाविकांचा भाव आणि त्यांची आवश्यकता यांनुसार श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या विविध कुंडलिनी नाड्या विविध वेळी जागृत होतात.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची निर्मिती केलेले मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भगवंताशी अंशात्मकरित्या एकरूप झाल्यामुळे श्री रामलल्लाचे शिल्प घडवत असतांना मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी काही क्षण सायुज्य मुक्तीची अनुभूती घेतली.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

शिवधनुष्य भंग करून सीतेशी स्वयंवर केल्यावर श्रीरामामधील शक्ती जागृत झाली आणि त्याच्याकडून श्रीविष्णूच्या तत्त्व लहरींसहित रामतत्त्वयुक्त अन् सीतामय झालेल्या दैवी शक्तीचे प्रक्षेपण वाढले.

समष्टी सोहळे आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व !

अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे.

शिवभक्त महानंदा शिवासाठी नृत्य करत असतांना तिला स्फुरलेली कविता !

तुझेच कीर्तन आणि तुझेच अर्चन ।
तुझेच पूजन नि तुझ्यासाठीच नर्तन ।

अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्याने विश्वात रामराज्याची स्थापना होऊन सुवर्णयुगाचा प्रारंभ लवकरच होणार असणे

अयोध्येत श्रीराममंदिराच्या स्थापनेच्या अंतर्गत झालेल्या किंवा होणार्‍या विविध धार्मिक विधींच्या वेळी सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया आणि आध्यात्मिक स्तरावर भाविकांना झालेला लाभ !