विविध संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ दिवस निराहार रहाणे (भोजन न करणे)

मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते. पहिल्यांदा जेव्हा ते अयोध्या सोडून निघाले, दुसर्‍यांदा जेव्हा तिन्ही माता आणि गुरुजन वनात भेटायला आले अन् त्याच वेळी पिता राजा दशरथ यांच्या निधनाची वार्ता समजली. तिसर्‍यांदा जेव्हा जानकीचे हरण झाले. चौथ्यांदा जेव्हा मेघनादने लक्ष्मणावर शक्ती फेकली आणि पाचव्यांंदा जेव्हा जगातील अद्वितीय विद्वान रावणाने या संसाराचा अंतिम निरोप घेतला.