कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, तुमच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे आम्ही ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य करू शकत आहोत. हिंदूंवरील अन्याय आणि आघात सडेतोडपणे मांडण्याचे धैर्य तुम्ही आम्हा सर्वांमध्ये निर्माण केले आहे.

गुरुबोध

संतांवर लोक प्रेम करतात; कारण त्यांचे देह प्रेममय असतात. संतांचे देह मऊ लुसलुशीत असतात; कारण त्यांच्या मनाची मृदुता पराकोटीची असते.

गुरुबोध   

संकल्प : विकल्प हा वृत्तीचा स्थायीभाव आहे. त्याला बांध घालण्याकरता व्यर्थ काळक्षेप न करता, ज्याने वृत्ती दिली आहे, त्या वृत्तीमय आणि निवृत्तीमय भगवंतालाच आळवत रहावे. काय व्हायचे असेल, ते होवो.

मनाला मूळ स्वरूपाची ओळख करून देणे महत्त्वाचे !

जे मुळात चांगले असते तेच पुन्हा प्रयत्नाने चांगले करण्याने स्वच्छ होते. मन हे मुळात सत्त्वगुणी असल्याने ‘सज्जनपणा’ हाच त्याचा स्वभाव आहे.

संतांचा सत्संग मिळूनही स्वतःत पालट न करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक !

विषयाची आवड न्यून झाल्याविना भगवंताची आवड निर्माण होणारच नाही. त्याग आणि भोग एकाच वेळी कसे येतील ? नाम घेतले आणि चिंता, दुःख दूर झाले नाही, याचा अर्थ नाम घेतलेच नाही.

संत, नाम आणि भगवंत

संत संसाराविषयी बोलतील; पण अनुसंधान भगवंताचे ठेवतील. संतांचा नामाचा आनंद एवढा असतो की, त्यात सर्व दु:खे विरघळून जातात. आपल्याला विषयाचा आनंद एवढा मोठा वाटतो की, भगवंत त्यात विरघळतो.

सद्गुरूंचे महत्त्व

सद्गुरु शब्दज्ञान देत नाहीत. भक्ती आणि अखंड आनंद देणे, हे सद्गुरूंचे कार्य. शब्दज्ञान विसरावे लागते. शब्दज्ञान हे अहंकार वाढवणारे भूत आहे. ज्ञानाचे पर्यवसान आनंदात व्हावे. संत चारही योगांचे अधिपती असतात.

जीभ

जीभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे. माणूस हवा तेवढा वृद्ध होवो, देहावर सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे; पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच रहातो.

प्रपंचही ईश्वराचा आहे !

आपण भजनाला लागलो, तर प्रपंच कसा चालेल, याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर संत तुकाराम महाराजांसारखे झालो, तर वाईट काय ? बरे तसे न झाले, तर प्रपंच चालूच आहे. प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया.