असंस्कृतांचा संस्कृतद्वेष !
संस्कृतच्या उत्कर्षासाठी स्थापन झालेले पहिले दोन आयोगही काँग्रेसच्या कार्यकाळात स्थापन झाले होते. काँग्रेसने हे निर्णय जरी घेतले असले, तरी त्यांच्या काळात संस्कृतच्या पदरी उपेक्षाच वाट्याला आली, हेही तितकेच खरे. ही चूक सुधारून विद्यमान सरकारने तरी संस्कृतला राजाश्रय द्यावा. हेच आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पडलेले पाऊल असेल !