निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणार्‍यावर कारवाई होणार !

मतदारांनी मतदान करायला जातांना भ्रमणभाष सोबत घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रात भ्रमणभाष नेण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणार्‍यावर कडक कारवाई करण्यात येईल….

हरिद्वार आणि धारवाड येथे ‘सनातन प्रभात’च्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’मधील अनुक्रमे हिंदी पाक्षिक आणि कन्नड साप्ताहिक यांचे प्रकाशन

सनातन प्रभात गेल्या २० वर्षांपासून अखंड धर्मसेवा करत आहे. संतांच्या वचनानुसार चालणार्‍या सनातन प्रभातला सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी सनातन प्रभात दिशा देत आहे. – महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद ब्रह्मचारी महाराज

मुले भ्रमणभाषवर काय खेळतात, हे पहाण्याचे सर्वस्वी दायित्व पालकांचे ! – मुंबई उच्च न्यायालय

पालकच आपल्या मुलांना आयफोनसारखे महागडे फोन विकत घेऊन देतात. त्यामुळे ‘पबजी’सारखे हिंसक खेळ खेळण्यास मुले उद्युक्त होतात.

‘व्हॉटस्अ‍ॅप’चे स्टेटस ठेवण्यावरून तरुणावर खुनी आक्रमण

तरुण पिढी सामाजिक माध्यमांच्या अति आहारी जात असल्याचा दुष्परिणाम ! यावरून समाजाला असणारी धर्मशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित होते.

‘टिक टॉक’ या चिनी अ‍ॅपवर बंदी घाला ! – मद्रास उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

चीननिर्मित ‘टिक टॉक’ या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. हे अ‍ॅप आक्षेपार्ह आणि अश्‍लील व्हिडिओंना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

भारतात भ्रमणभाषचा वापर करणार्‍या ३ पैकी एका महिलेला अश्‍लील कॉल्स येतात !

एका अ‍ॅपद्वारे २ सहस्र १५० महिलांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये देशातील भ्रमणभाष वापर करणार्‍या ३ पैकी एका महिलेला नियमित अश्‍लील कॉल किंवा मजकूर पाठवला जातो, असे समोर आले आहे.

स्मार्टफोन खरेदीची प्रक्रिया पारदर्शक !

अंगणवाडी सेविकांसाठी खरेदीची सर्व प्रक्रिया ही जीईएम् पोर्टलवर अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली आहे. त्यानंतर शासनाची राज्यस्तरीय खरेदी समिती आणि उच्च अधिकार समिती यांच्या मान्यतेने निविदाधारकास स्मार्टफोन पुरवठ्याचा आदेश देण्यात आला.

अंगणवाडी सेविकांसाठी भ्रमणभाष खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडून ६५ कोटी रुपयांचा घोटाळा ! – धनंजय मुंडे यांचा आरोप

अंगणवाडी सेविका, साहाय्यक अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्यासाठी भ्रमणभाष खरेदी करतांना बाजारात ६ सहस्र ४०० रुपये इतके मूल्य असलेला अ‍ॅन्ड्रॉईड बेस्टचा भ्रमणभाष ८ सहस्र ८७७ रुपये किमतीला विकत घेण्यात येत आहे.

पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रावर भ्रमणभाष आणण्यास प्रतिबंध !

सध्या १० वीच्या परीक्षा चालू आहेत. या काळात विद्यार्थ्यांना वर्गात भ्रमणभाष आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भ्रमणभाषच्या अतिरेकामुळे भारतीय कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर

भ्रमणभाष वापरण्याच्या अतिरेकामुळे घरातील सदस्यांतील संवाद लोप पावत आहे. घरातील प्रेम आणि जिव्हाळा संपुष्टात आला असून जगण्यात कोरडेपणा आला आहे. यामुळे जीवनात नैराश्य आणि वैफल्य यांनी प्रवेश केला असून आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now