Georgia Passed Bill Against Hinduphobia : अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने केला हिंदुद्वेषाच्या विरोधातील कायदा !

हिंदुद्वेषाविरुद्ध विधेयक सादर करणारे जॉर्जिया पहिले अमेरिकन राज्य बनले !

हिंदूंनी केले निर्णयाचे स्वागत !

तिबिलिसी (जॉर्जिया) : अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने हिंदुद्वेष (हिंदुफोबिया) आणि हिंदुविरोधी भेदभाव रोखण्यासाठी कायदा केला आहे. असे करणारे ते अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे. या संदर्भातील विधेयक ४ एप्रिल या दिवशी विधानसभेत सादर करण्यात आले होते. या कायद्यामुळे हिंदूंच्या संदर्भात भेदभाव आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे. वंश, रंग, धर्म किंवा राष्ट्रीय उत्पत्ती यांच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करणार्‍या विद्यमान कायद्यांमध्ये या कायद्याचा समावेश केला जाणार आहे.

१. जॉर्जियाने एप्रिल २०२३ मध्ये हिंदुद्वेष आणि हिंदुविरोधी कट्टरता यांचा निषेध करणारा ठराव संमत केला होता. तसेच हिंदु धर्माला ‘जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत प्राचीन धर्मांपैकी एक’ म्हणून मान्यता दिली.

२. हिंदू-अमेरिकी संघटना ‘कोएलेशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ने (उत्तर अमेरिकेतील हिंदूंच्या युतीने) या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संपादकीय भूमिका

जे भारताने गेल्या ७८ वर्षांत केले नाही, ते अमेरिकेतील एका राज्याने केले, हे भारताला लज्जास्पद !