बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

  • ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांवर आक्रमण !

  • हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांची लूट !

  • इस्लामी देशांत अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे हे भारतातील हिंदू आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद ! अशी आक्रमणे रोखण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • जिहादी पाक आणि बांगलादेश येथून पलायन करून आलेल्या हिंदूंना नागरिकत्व देण्याच्या विरोधात आकांडतांडव करणारे धर्मनिरपेक्षतावादी आता मात्र गप्प आहेत. भारतीय मुसलमानांच्या विरोधात खुट्ट झाले, तरी त्यांची तळी उचलणारे निधर्मी राजकारणी, पुरोगामी यांना भारतभरातील हिंदूंनी जाब विचारला पाहिजे ! – संपादक 
  • भारतीय अल्पसंख्यांकांवर आक्रमण केल्याचा आव आणून त्याचे राजकारण करणार्‍या राजकीय पक्षांच्या षड्यंत्राला हातभार लावत त्यावर सातत्याने वार्तांकन करणार्‍या भारतीय वृत्तवाहिन्या इस्लामी देशातील अल्पसंख्य हिंदूंवरील आक्रमणांच्या घटनांची ‘ब्रेकिंग न्यूज’ तर सोडाच; पण साधी तळटीपही देत नाहीत ! हिंदूंंनो, अशा वृत्तवाहिन्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर बहिष्कार घाला ! – संपादक 
हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – येथील खुलना जिल्ह्यात असलेल्या शियाली गावात शेकडो धर्मांध ७ ऑगस्टच्या दुपारी एकत्र आले. त्यांनी गावातील हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण करत तेथे नासधूस केली. यामध्ये ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांचा समावेश आहे. स्थानिक हिंदूंनी दिलेल्या माहितीनुसार धर्मांधांनी गोविंद मंदिर, शियाली पूर्वपारा हरि मंदिर, शियाली पूर्वपारा दुर्गा मंदिर, शियाली महास्मशान मंदिर येथील देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. त्यानंतर धर्मांधांनी हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांच्यावरही आक्रमण करत ती लूटली. धर्मांधांनी हिंदूंवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करत त्यांना घायाळ केले. तेथील गायी आणि अन्य पाळीव प्राणी यांनाही पळवून नेले. या घटनेनंतर स्थानिक पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.

१. स्थानिक गावकरी आणि पूजा परिषदेचे नेते यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ ऑगस्टच्या रात्री ९ वाजता स्थानिक हिंदु महिला कीर्तन करण्यासाठी ‘हरे कृष्ण’ म्हणत जात होत्या. एका मशिदीपाशी आल्यावर तेथील इमामाने त्यांना हटकले आणि नामजप करण्यास मज्जाव केला. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. दुसर्‍या दिवशी दोन्ही गटांत समेट घडवण्यासाठी पोलीस ठाण्यात एकत्र जमण्याचे ठरले.

२. दुसर्‍या दिवशी मात्र जवळच्या चांदपूर गावातून शेकडो धर्मांध कोयते, कुर्‍हाडी, चाकू इत्यादी धारदार शस्त्रे घेऊन शियाली गावात घुसले आणि मंदिरांवर आक्रमण केले, तसेच हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली.


पोलिसांनी धर्मांधांचा पाठलाग करण्यास हिंदूंना केला मज्जाव !

इस्लामी राष्ट्र असलेल्या बांगलादेशातील पोलिसांकडून आणखी काय अपेक्षा करणार ?

रूपशा ठाणा पूजोत्सव परिषदेचे अध्यक्ष शक्तीपाद बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदूंनी पोलिसांकडे आक्रमणकर्त्या धर्मांधांचा पाठलाग करण्याचा आग्रह धरला; परंतु पोलिसांनी त्यास नकार दिला. त्यामुळे हिंदू स्वत: धर्मांधांना पकडण्यासाठी जाऊ लागले, परंतु पोलिसांनी त्यांना अडवले आणि प्रतिकार करण्यापासून परावृत्त केले.