बंगालमध्ये पोलीस अधिकार्‍याला ठार करणार्‍या जमावातील तिघा धर्मांधांना अटक

बिहारचे दिवंगत पोलीस अधिकारी अश्‍विनी कुमार

दिनाजपूर (बंगाल) – बिहारचे पोलीस पथक चोरीच्या प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी येथे गेले असता धर्मांधांच्या जमावाने पोलीस अधिकारी अश्‍विनी कुमार यांना अमानुष मारहाण करत त्यांचा गळा आवळून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी फिरोज अस्लम, अबुझर अस्लम आणि साहिनूर खान यांना अटक केली. (अनेक मोहल्ल्यांत पोलीस धर्मांध आरोपीला पकडण्यास गेल्यास त्यांच्यावर आक्रमणे होतात. याविषयी देशातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी तोंड उघडत नाहीत ! – संपादक)