MP Hanuman Jayanti Procession Attacked : गुना (मध्यप्रदेश) येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीतून झाले आक्रमण

  • भाजपच्या नगसेवकासह काही जण घायाळ

  • मशिदीसमोर मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजवण्यावरून वाद

गुना (मध्यप्रदेश) : येथे १२ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. कर्नलगंज भागामध्ये मशिदीसमोर मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा (डीजे) वाजवण्यावरून मुसलमानांकडून मशिदींतून मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर मशिदीतून दगडफेक करण्यात आली. यात अनेक हिंदू घायाळ घायाळ झाले. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. ही मिरवणूक भाजपचे नगरसेवक गब्बर कुशवाह यांनी काढली होती. या आक्रमणात स्वतः कुशवाह आणि त्यांचा मुलगा यांच्यासह अनेक हिंदू घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

गुनाचे पोलीस अधीक्षक संजीव कुमार सिन्हा म्हणाले की,

ही मिरवणूक अनुमतीविना बलपूर्वक काढण्यात आली. मिरवणूक कर्नलगंज मशिदीजवळून जात होती त्या वेळी २ गटांत घोषणाबाजी झाली. दगडफेकही झाल्याचे कळते, ज्यामध्ये काही लोक घायाळ झाले आहेत. माहिती मिळताच तात्काळ पोलीस पाठवण्यात आले. १५ ते २० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. चित्रीकरणाच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य आहे. जनतेने अफवांकडे लक्ष देऊ नये.

हिंदु संघटनांकडून पोलीस ठाण्याला घेराव

आक्रमणाच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदु संघटना आणि स्थानिक हिंदु यांनी कर्नलगंज चौकात रस्ता बंद आंदोलन केले, तसेच शहर पोलीस ठाण्याला घेराव घालत घोषणाबाजी केली. त्यांनी दगडफेक करणार्‍या मुसलमानांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

ताजिया समितीच्या अध्यक्षावर गुन्हा नोंद

भाजपचे नगरसेवक गब्बर कुशवाह यांनी शहर पोलीस ठाण्यात धर्मांध मुसलमानांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात ताजिया (एका मुसलमान धर्मगुरूच्या समाधीची प्रतिकृती. ती अनेक प्रकारात आणि आकारात बनवली जाते.) समितीचे अध्यक्ष युसूफ खान आणि इतर यांच्यांवर दगडफेक केल्याचा अन् दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

  • मध्यप्रदेशात भाजपची २० हून अधिक वर्षे सत्ता असतांना धर्मांधांचे अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही, अशी वचक निर्माण होणे हिंदूंना अपेक्षित आहे !
  • हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मुसलमानांच्या मशिदीजवळून जाणार असतील, तेव्हा अशा मशिदींची तपासणी करण्यासह येथेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा आता नियमच केला पाहिजे !