महाराष्ट्रातील ४१९ तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भात प्रस्ताव संमत !  

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामविकास विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणला होता. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटी रुपयांचे प्रावधान सुचवले होते. मंत्रीमंडळाने त्यास मान्यता दिली.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल.

Pensioners Strike Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे !

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

गरोदर महिलेचा मृत्यू आणि असंवेदनशील आरोग्य विभाग !

आमदारांनी उपस्थित केलेले सर्वच प्रश्न गंभीर असून आरोग्य विभागाची दु:स्थिती दाखवणारे आहेत. यामुळे ‘आरोग्य यंत्रणा रुग्णांना जगवण्यासाठी कि मारण्यासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने या प्रकरणात गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.

सदस्यांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे २० मिनिटे सभागृह स्थगित !

‘कळमनुरी येथील आदिवासींसाठी असलेल्या शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव’ या लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर मान्य नसल्याने विरोधकांनी सभागृहांमध्ये गोंधळ केला, तेव्हा ८ मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आले.

निवासी आणि अनिवासी सर्वच आश्रमशाळांना अनुदान देण्यात येईल ! – गुलाबराव पाटील, मंत्री

राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी आणि अनिवासी आश्रमशाळेतील शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचार्‍यांना केंद्रशासनाच्या धर्तीवर १०० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव वित्तखात्याकडे पाठवला आहे.

बेरोजगारी आणि पेपरफुटी यांवरून विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राज्य सरकारचा निषेध !

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी बेरोजगारी आणि पेपरफुटी प्रकरण यांसारख्या सूत्रांवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.

काँग्रेसच्या काळात निवडणूक घोषित होण्यापूर्वी मुंबईतील आरे वसाहतीमधील श्रीराम मंदिराजवळील भूखंड कब्रस्थानासाठी हस्तांतरित !

काँग्रेसचे सरकार असतांना आरे वसाहत युनिट २० येथील श्रीराम मंदिराच्या जवळील अडीच सहस्र मीटर भूमी एका खासगी संस्थेला कब्रस्थानासाठी देण्यात आली.

मराठा आरक्षणावरून बीड येथे झालेल्या हिंसाचाराची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार !

या दुर्घटनेतील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे ? याचे अन्वेषण होत आहे. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. कारवाईपासून आम्ही मागे हटणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षातील असले, तरी आरोपींवर कारवाई केली जाईल – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

Love Jihad : लव्ह जिहाद कायद्याविषयी शासन गंभीर; लवकरच निर्णय कळेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हा कायदा तात्काळ करावा, अशी आग्रहाची मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली.