नागपूर – सकाळच्या सत्रांमध्ये सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील सदस्य अत्यल्प उपस्थित असल्याने २० मिनिटे सभागृह स्थगित करण्यात आले. त्यानंतर ‘कळमनुरी येथील आदिवासींसाठी असलेल्या शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव’ या लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर मान्य नसल्याने विरोधकांनी सभागृहांमध्ये गोंधळ केला, तेव्हा ८ मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आले.
उपसभापती नीलम गोर्हे यांनी व्यक्त केली खंत !
मंत्री अतुल सावे यांना सभागृहामध्ये निवेदन सादर करायचे होते. त्यांनी नियमांनुसार छपाई (प्रिंटेड) स्वरूपामध्ये निवेदन सादर करणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी हस्तलिखित निवेदन सादर केले. ‘हे नियमबाह्य आहे, अशी चुकीची प्रथा पाडू नका’, अशी खंत उपसभापती नीलम गोर्हे यांनी व्यक्त केली.