अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अवेळी पडलेल्या पावसावरील चर्चेचा विरोधकांचा प्रस्ताव !

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या हानीवर चर्चा करण्याची मागणी केली.

मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे न दिल्यास कायदेशीर कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मराठी कलावंतांनी सिद्ध केलेल्या चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नसतील, तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !

नवाब मलिक सभागृहात अजित पवार यांच्या बाजूच्या गटात बसले होते, तसेच सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही अजित पवार कार्यालयात उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या निर्णयावरून ७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

विधीमंडळात ५५ सहस्र ५२० कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळात तब्बल ५५,५२०.७७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

अपात्र ठरल्यासही शिवसेनेच्या आमदारांना विधान परिषदेची निवडणूक लढवता येणार ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर. विधानसभा अध्यक्ष

‘‘विधानसभेचा सदस्य म्हणून अपात्र झालेली व्यक्ती विधान परिषदेची निवडणूक लढू शकते; मात्र तिच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद नसावा किंवा वयाची ३० वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.’’ यावरून त्यांनी ‘शिवसेनेचे आमदार अपात्र ठरले, तरी त्यांना विधान परिषदेचे सदस्य होता येईल’.

‘खोके सरकार ४२०’ असल्याची विरोधकांची विधीमंडळाच्या बाहेर घोषणाबाजी !

खोके सरकार ४२०’च्या घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या इमारतीच्या बाहेर सत्ताधारी पक्षाचा निषेध केला.