महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
साहित्य संमेलनासाठी तब्बल २ कोटी रुपये संमत !
नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) : महाराष्ट्रातील अशा ४१९ तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामविकास विभागाने १४ डिसेंबर या दिवशी विधानभवनात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणला होता. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटी रुपयांचे प्रावधान सुचवले होते. मंत्रीमंडळाने त्यास मान्यता दिली. येणार्या भक्तांच्या दृष्टीने विविध सुविधा उभारण्यासाठी निधी व्यय केला जाईल. राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या ६ जागांचा विकास ‘पीपीपी मॉडेल’वर करण्यात येईल. त्यात महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा, मिठबाव, हरिहरेश्वर आदींचा समावेश आहे.
साहित्य संमेलनासाठी २ कोटी रुपये संमत !
यापुढे राज्यात प्रतिवर्षी होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्यात सरकार २ कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. पुढील वर्षी अमळनेर येथे होणार्या साहित्य संमेलनापासून या निर्णयाची कार्यवाही केली जाणार आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये वर्धा येथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले होते. यामध्ये शासनाने आता दीड लाख रुपयांची वाढ केली आहे. पर्यटनातून युवकांना रोजगार मिळावा, यासाठी प्रशिक्षण देण्यावर १९६ कोटी रुपये व्यय केले जातील. प्रत्येक जिल्ह्यात असे एकूण ५०० युवक-युवती प्रशिक्षित केले जाणार आहेत. मिशन ऑलिंपिकसाठी १६० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.