Mumbai Bomb Blast : मुंबई बाँबस्फोटातील आरोपीसमवेत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने मेजवानी केल्याचा आमदार नीतेश राणे यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप !

देशावर आक्रमण करून निष्पाप लोकांना मारणार्‍या कटातील आरोपीसमवेत मेजवानी करणार्‍या लोकांवर पक्षाच्या अंतर्गतही कारवाई करण्यात यावी. असे प्रकार आतंकवादी कारवायांना खतपाणी घालणारे आहेत.

जुने निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘जुने निवृत्ती वेतन लागू करण्याविषयी शासन सकारात्मक असून कर्मचारी संघटनांनी संप त्वरित मागे घ्यावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

शाळेतील ‘सखी सावित्री समिती’मध्ये महिला आमदारांना सामावून घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री 

शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांचे समुपदेशन करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘सखी सावित्री समिती’च्या कार्यामध्ये महिला आमदार यांना सामावून घ्यावे अशी सूचना उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केली होती.

राज्यातील अपात्र शाळांनी निकषांची पूर्तता करावी ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

आमदार विक्रम काळे यांनी ‘विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अन् वर्ग तुकड्यांना प्रचलित अनुदान देण्याविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

‘महादेव ॲप’चे धागेदोरे दाऊदपर्यंत पोचल्याची गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती !

छत्तीसगड राज्यात ‘महादेव ॲप’द्वारे होणारी फसवणूक उघड झाली. त्यानंतर विविध राज्यांत या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.

आमदारांच्या सामूहिक छायाचित्रासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळेत न आल्याने आमदार अप्रसन्न !

विधानसभेतील सर्वच पक्षांतील आमदारांचे छायाचित्र काढण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेळेवर न आल्याने स्थगित करण्यात आला. शेवटी दुपारी सामूहिक छायाचित्र काढले गेले.

Gambling Online Gaming : लवकरच ‘डेटा शेअरिंग’विषयी केंद्रशासन कायदा करेल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

एप्रिल-मेपर्यंत ही यंत्रणा सिद्ध करण्यात येईल. ही यंत्रणा सायबर गुन्ह्यांशी लढा देईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

Conversion Of Hindus : राज्यामध्ये ‘धर्मांतर बंदी कायद्या’विषयी सरकार गंभीर ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री

विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासी यांचे धर्मांतर करणार्‍यांना जरब बसवू. बळजोरीने धर्मांतर केल्याची तक्रार आल्यास सरकार कारवाई करेल.

‘मे. रोडवेज इंडिया इंफ्रा लि.’ या आस्थापनाला काळ्या सूचीमध्ये टाकता येत नाही – उदय सामंत, उद्योगमंत्री

‘मे. रोडवेज इंडिया इंफ्रा लि.’ या आस्थापनाची निविदा कोणत्या कारणांनी रहित करण्यात आली, त्याचे नियम पाहू.

नाशिकमध्ये भ्रदकाली परिसरात अल्पसंख्यांकाडून अवैध धंदे चालू ! – आमदार नीतेश राणे, भाजप

शटर बंद करून रात्री उशिरापर्यंत अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी व्हिडिओचे पुरावेही पाठवले आहेत.