अमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. सदस्य अशोक उपाख्य भाई जगताप यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

संपादकीय : नशेच्या गर्तेत त्रिपुरा !

चित्रपटातील व्यसनाधीन दृश्यांच्या भडीमारामुळे त्याचे अनुकरण करणारी तरुण पिढी निपजणे, हे देशासाठी धोकादायक !

Tripura HIV Case : त्रिपुरात ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्आयव्ही’ बाधित !

अमली पदार्थांच्या इंजेक्शनच्या वापराचा परिणाम !

ललित पाटील याला पसार होण्यास साहाय्य करणारे २ पोलीस हवालदार बडतर्फ !

पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील याला ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तून पसार होण्यास साहाय्य करणार्‍या पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. या प्रकरणी पोलीसदलातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांचे निलंबन करण्यात आले होते. अन्वेषणामध्ये दोषी आढळून आलेल्या २ जणांवर कारवाई केली. … Read more

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक !; पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !…

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत वरूड येथे तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी अर्जदार महिलांकडून पैसे घेतले. या प्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे.

पुणे येथील अमली पदार्थ प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची सरकार पक्षाची मागणी !

त्यांचे अन्य कुणी साथीदार त्यांना अमली पदार्थ पुरवण्यास साहाय्य करतात, याविषयीचे अन्वेषण करायचे असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षासह अन्वेषण अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयाला केली.

थोडक्यात : ५५ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थ साठा जप्त !………बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाचा समावेश !

गेल्या ६ महिन्यांत ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री प्रकरणात ११२ आरोपींना अटक केली आहे. ५५ कोटी ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ, अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य आणि रसायने जप्त केली आहे.

एफ्.सी. रोडवरील ‘एल् थ्री’ बारमधील मेजवानीसाठी पुण्यातूनच अमली पदार्थांचा पुरवठा झाल्याचे उघड !

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लीजर लाउंज (एल् थ्री) बारमध्ये झालेल्या मेजवानीतील तरुणांना अमली पदार्थांचा पुरवठा पुण्यातूनच झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणातून ही गोष्ट समोर आली आहे.

मुंबईतून मॅफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत !

मुंबईतून कुणाकडून अमली पदार्थ घेतले, ती सर्व साखळी पोलिसांनी नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे !

संपादकीय : पुण्यनगरीतील ‘अंमल’ !

भारतातील सांस्कृतिक शहराची ओळख पालटवण्यास उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याखेरीज पर्याय नाही !