देशात गेल्‍या वर्षात २१ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त

प्रतिकात्मक छायाचित्र

जोधपूर (राजस्‍थान) – भारतात एका वर्षात २१ सहस्र कोटींहून अधिक रुपयांचे एम्‌डी ड्रग्‍ज, हेरॉइन आणि ते बनवण्‍यासाठी वापरले जाणारे रसायन जप्‍त करण्‍यात आले आहे.

कर्णावती, जोधपूर, ओसियान, बाडमेर आणि भोपाळ येथे पकडण्‍यात आलेल्‍या कारखान्‍यांमध्‍ये एम्.डी. नावाचे अमली पदार्थ बनवण्‍याचे संपूर्ण साहित्‍य रासायनिक स्‍वरूपात आढळून आले. यातून लक्षात आले की, हे अमली पदार्थ विदेशातून तस्‍करीद्वारे येत नसून भारतातच बनवले जात होते. त्‍यामुळे अशा कारखान्‍यांवर आणि वितरित करणार्‍यांवर लक्ष ठेवले जात आहे. दूध किंवा पाणी यांचा पुरवठा करणार्‍या टँकरमधून अमली पदार्थांचे वितरण केले जाते.

संपादकीय भूमिका

जप्‍त झालेले अमली पदार्थ इतके आहे, तर न जप्‍त झालेले किती असू शकेल ? हे अमली पदार्थ भारतात येतेच कसे ? जर ते भारतातच बनवले जात असेल, तर अन्‍वेषण यंत्रणा आणि गुप्‍तचर यंत्रणा यांना याची माहिती का मिळत नाही ?