पुणे येथे ३ उच्चशिक्षित तरुणांना अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – सिंहगड रस्ता परिसरामध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या उच्चशिक्षित अंशुल मिश्रा, आर्श व्यास आणि पियूष इंगळे यांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मॅफेड्रोन असा १९ लाख ४५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थविरोधी पथक नर्‍हे परिसरामध्ये गस्त घालत होते. नर्‍हे येथील भूमकर चौकात काही जण अमली पदार्थ घेऊन येणार आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. तेव्हा सापळा रचून त्यांना अटक केली. ते तिघे आपल्या मित्रांना अमली पदार्थ विक्री करत असल्याचे चौकशीतून समोर आले.

संपादकीय भूमिका :

आपल्याच वयाच्या तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावणार्‍या उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे !