अमली पदार्थ प्रकरणात कलाकार भारती सिंग यांना अटक

हास्य कलाकार भारती सिंग आणि त्यांचे पती हर्ष लिंबाचिया यांना अमली पदार्थ प्रकरणात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.ने) अटक केली आहे. पोलिसांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर धाड टाकली होती.

कोरेगाव पोलिसांकडून गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम

कोरेगाव पोलिसांनी गत आठवड्यापासून तालुक्यातील गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम चालू केली आहे.पोलिसांनी संशयिताकडून ३ लाख रुपयांचा ४९ किलो गांजा कह्यात घेतला आहे.