Pune Drug Adict Girls : पुणे येथील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्‍या तरुणींचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !

पुणे येथील ‘ड्रग्ज रॅकेट’च्या अन्वेषणात ‘इंटरपोल’चे साहाय्य !

पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनियाचे नाव समजल्यामुळे त्याच्या अन्वेषणासाठी ‘इंटरपोल’ (आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणारी संघटना)चे साहाय्य घेतले जाणार आहे.

जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले.

Heroin Seized From Veraval Port : वेरावळ (गुजरात) बंदरातून ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पकडण्यात येत असलेले अमली पदार्थ इतके आहे, तर न पकडण्यात आलेले किती असेल, याची कल्पना करता येत नाही !

पुण्यात सिद्ध झालेले अमली पदार्थ लंडनमध्ये पाठवण्यात आले !

यातून अमली पदार्थ सिद्ध करणार्‍यांची यंत्रणा किती दूरवर पसरली आहे, हे लक्षात येते. हे जाळे नष्ट करण्यासाठी पोलीस कठोर पावले केव्हा उचलणार ?

कुपवाड एम्.आय.डी.सी.तून ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या कुपवाडमध्ये आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. आरोपी आयुब मकानदार याने कुपवाडमध्ये खोली भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या.

मागील ३ दिवसांत ४ सहस्र कोटी रुपयांचे २ सहस्र किलो अमली पदार्थ जप्त !

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार एक परदेशी नागरिक ! सहस्रो रुपयांचे अमली पदार्थ सापडणे म्हणजे तरुण पिढी मनाने प्रचंड प्रमाणात कमकुवत होत असल्याचे द्योतक !

२ दिवसांच्या कारवाईत पुणे येथे १ सहस्र १०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त !

अमली पदार्थ विक्री करण्याचे प्रकार पोलिसांनी काही प्रमाणात उघडकीस आणले असूनही अद्याप कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ सापडतात

Stop Harassing Chinese : चिनी विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा ! – चीन

चीनचे सार्वजनिक सुरक्षामंत्री वांग शिओहोंग यांनी अमेरिकेचे ‘होमलँड सिक्युरिटी’चे सचिव अलेजांद्रो मेयोर्कास यांना सांगितले की, कागदपत्रे असूनही अमेरिकी विमानतळांवर चिनी विद्यार्थ्यांची कडक चौकशी केली जाते.

दि‍वसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गोवंडीतील आगीत १२ ते १५ झोपड्या जळून खाक !;  नागरिकांच्या सहकार्याने नक्षलवाद संपवू ! – रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक……

गोवंडीमधील बैंगनवाडी परिसरातील झोपडपट्टीत १७ फेब्रुवारीला पहाटे भीषण आग लागली. त्यात १२ ते १५ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही घायाळ झाले नाही. या आगीत गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले.