नाशिक येथे गंगागिरी भक्तमंडळाकडून सवा कोटी रुपयांची खंडणी घेतांना कल्याणच्या पत्रकाराला अटक

वैजापूर येथील सावखेड गंगा येथे गंगागिरी भक्तमंडळ आहे. ते विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन सप्ताहाचे आयोजन करतात. या भक्तमंडळाने येवला तालुक्यात ५ ते १२ ऑगस्टच्या काळात सप्ताह घेतला.

पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही ! – निर्मला सीतारामन्, केंद्रीय अर्थमंत्री

पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केले. लुटारूंनी बँक लुटली. आता खातेदारांचे काय ?, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.

उपाहारगृह चालकास धमकी देऊन खंडणी मागणार्‍या काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षासह ५ जणांना अटक

येथील एका उपाहारगृह चालकास त्याचे अश्‍लील छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित करण्याची धमकी देऊन काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अय्याज नायकवडी यांच्यासह ४ जणांनी १० लाख रुपयांची खंडणी मागितली.

मंत्रालयातील कनिष्ठ लिपिकाला लाच घेतांना अटक

मंत्रालयात गृहविभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले अविनाश गलांडे यांना लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ ऑक्टोबर या दिवशी रंगेहात पकडले.

पालघर तहसील कार्यालयातील लाचखोर अव्वल कारकुनासह खासगी व्यक्ती अटकेत

कुळ कायद्यानुसार झालेल्या निकालाची प्रत देण्यासाठी पालघर तहसील कार्यालयातील कुळ वहिवाट विभागातील अव्वल कारकून प्रशांत वासुदेव मेहेर (वय ५३ वर्षे) याला १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

रुग्णाचे तातडीने शस्त्रकर्म करणे आवश्यक असतांना त्याच्या नातेवाइकांच्या हतबलतेचा अपलाभ घेऊन त्यांच्या ‘मेडीक्लेम’च्या रकमेएवढे देयक लावून पैसे उकळणारे आधुनिक वैद्य !

‘दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीला जेवण झाले की, लगेच उलट्या होत होत्या. असा त्रास तिला सारखा होत असल्यामुळे आम्ही डोंबिवली येथील एका रुग्णालयामध्ये गेलो.

केवळ निवडणुकीच्या वेळी नाही, तर वर्षभर शीघ्र कृती दले कार्यरत ठेवा !

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काळ्या पैशाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाच्या अन्वेषण संचालनालयाच्या सुविधांचा वापर करण्याचे ठरवले आहे.

पीएमसी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएम्सी) अपव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ४ ऑक्टोबरला पीएम्सी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केली आहे. पीएम्सी बँकेच्या घोटाळ्यातील ही तिसरी अटक आहे.

(म्हणे) ‘सत्तेसाठी सर्वकाही करण्याची सिद्धता असणार्‍यांना गांधीजींच्या अहिंसेचे महत्त्व कसे काय कळणार ?’ – सोनिया गांधी

काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे देशावर राज्य केले. या काळात साडेतीन सहस्र शिखांचे हत्याकांड झाले, अनेक दंगलींमध्ये हिंदूंचे शिरकाण झाले. त्यामुळे अशा पक्षाच्या अध्यक्षांनी अहिंसेच्या गोष्टी करणे हा विनोद म्हणावा लागेल !

गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपची राज्यात सत्ता आल्यापासून गोंदियातील काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल शरीराने काँग्रेससमवेत असले तरी, मनाने आमच्यासमवेतच होते. त्यामुळे त्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष नियुक्त करताच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे.


Multi Language |Offline reading | PDF