Imran Khan Sentenced To Jail : इम्रान खान यांना १४ वर्ष, तर पत्नी बुशरा यांना ७ वर्ष कारावासाची शिक्षा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना ‘अल् कादीर ट्रस्ट’शी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

इम्रान खान यांना १४ वर्षे, तर बुशरा बीबी यांना ७ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीतील ५०० कोटी पाकिस्तानी रुपयांची हानी केल्याचा आरोप आहे. इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून अदियाला कारागृहात अटकेत आहेत. त्यांच्यावरील प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी कारागृहात तात्पुरते न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.