जळगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारतांना कह्यात

सरकारी कर्मचार्‍यांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण निंदनीय ! असे भ्रष्ट पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक ?

हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २०.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण १० लाख रुपयांची लाच घेतांना कह्यात

एका आधुनिक वैद्यांकडून धाड न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतांना प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण यांना लक्ष्मीपुरी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. 

लाच स्वीकारणार्‍या पिंपरी येथील महिला पोलीस निलंबित

पुरुषांच्या समवेत आता महिलाही लाच घेण्यात कचरत नाहीत. यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते !

शासन गोवा मुक्तीदिन सोहळ्यावर ३ कोटी १० लाख रुपये खर्च करणार ! – काँग्रेस

स्वातंत्र्यसैनिकांच्या बलीदानाचा कुणीही गैरलाभ उठवू नये.

समाजवादी दिखाऊपणा !

प्रत्येक वेळी हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन आणि ‘भक्त’पणाचा आव आणून सत्ताकारण करता येत नाही, हे अखिलेश यादव यांनी लक्षात घेऊन श्रीरामाप्रमाणे आदर्श ‘रामराज्य’ आणण्यासाठी अन् श्रीकृष्णाप्रमाणे आदर्श राष्ट्रकारण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे !

शेतकर्‍यांचे हित !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानी आणि माओवादी शक्ती बळ पुरवत असल्याची शक्यता आहे, अशी वृत्ते पुराव्यानिशी येत आहेत. हे धोकादायक आहे.

माझ्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो ! – बिहारमधील भाजपच्या मंत्र्यांचे विधान

स्वतःच्या खात्यात होणारा भ्रष्टाचार स्वतः मंत्र्यांनीच कठोर कारवाईचा आदेश देऊन रोखायला हवा आणि त्याची माहिती नंतर जनतेला द्यायला हवी ! आता अशा प्रकारे विधान केल्यावर भ्रष्टाचारी सतर्क होतील !

राजस्थानच्या लाचलुचपत खात्याच्या उपअधीक्षकालाच लाच घेतांना रंगेहात अटक

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली.