अभ्यासदौर्‍याच्या नावाखाली मणीपूर येथे गेलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराचा तरुणीसमवेत अश्‍लील नृत्य करतांनाचा ‘व्हिडिओ’ प्रसारित

अनेक आमदार, खासदार, मंत्री देश-विदेशात अभ्यासदौर्‍याच्या निमित्ताने जात असतात; मात्र ते नेमका काय अभ्यास करतात आणि त्याचा लाभ जनतेला किती होतो, हे अद्यापपर्यंत एक कोडेच राहिले आहे ! त्यामुळे आता या व्हिडिओतून हे ‘अभ्यासदौरे असे असतात का’, असे जनतेला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘न्यायाधीश सवर्ण असल्यामुळेच लालूप्रसाद यादव यांना शिक्षा झाली !’ – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

‘न्यायाधीशही जातीनुसार निर्णय देतात’, असे म्हणणे हा न्यायालयाचा अवमान आहे. अशांना थेट कारागृहातच डांबण्याचा आदेश न्यायालयाने दिला पाहिजे ! स्वतःच्या नेत्याच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी अशा प्रकारे कायदाद्रोही विधाने करणारे नेते जनहित काय साधणार ?

राजदचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याची जन्मठेप कायम

बिहारमधील सिवान येथे वर्ष २००४ मध्ये दोन भावांना अ‍ॅसिडमध्ये बुडवून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार आणि नामचीन गुंड महंमद शहाबुद्दीन याला देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.

चौथ्या प्रकरणातही लालूप्रसाद यादव दोषी

झारखंडमधील डुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्र्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ……

राजदचे उमेदवार सरफराज आलम यांच्या विजयानंतर आररिया (बिहार) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा : दोघांना अटक

आररिया लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे उमदेवार सरफराज आलम हे विजयी झाल्यानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या

चारा घोटाळ्याच्या तिसर्‍या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय.च्या) विशेष न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. याशिवाय त्यांना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

तेजप्रताप यादव यांच्या कानशिलात लगावणार्‍यास भाजप नेता १ कोटी रुपये देणार

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना ‘घरात घुसून मारू’, अशी धमकी देणारे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांना आता भाजपच्या नेत्याने प्रत्युत्तरात धमकी दिली आहे.

(म्हणे) बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात तोडणारे अनेक जण आहेत ! – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी

धाडस असेल, तर तुम्ही हात तोडून दाखवाच, बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात तोडणारे अनेक जण आहेत, अशा शब्दांत बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी

बिहारमध्ये १५ दिवसांत सरकारी बंगले रिकामी करण्याच्या सरकारच्या आदेशाला स्थगिती

बिहारमध्ये माजी मंत्र्यांकडून सरकारी बंगले रिकामी करण्यात न आल्याने सरकारने पुढील १५ दिवसांत ते रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. त्यांना बळजोरीने बंगल्यातून हाकलण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now