परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजापूरचे वाहतूक नियंत्रक एस्.टी. सेवेतून बडतर्फ

बनावट शिक्का मारून आणि जादा पैशांची आकारणी करून एस्.टी. पासच्या विक्रीत २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी निलंबित असलेले येथील वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर एस्.टी. सेवेतून बडतर्फ !

‘इंडियन एक्सप्रेस’ची शोधमालिका : काळ्या पैशासंबंधी होणारे अपहार उघड

यापूर्वी इंडियन एक्सप्रेसने एकामागून एक शोधून काढलेल्या घोटाळ्यांच्या मालिकेतील आर्थिक घोटाळ्यांच्या मालिकेत उघडकीला आल्या आहेत फिनसेन फाइल्स ! त्यासंबंधी जाणून घेऊया . . .

३९ टक्के लाचखोरीचा दर असलेला भारत आशिया खंडातील सर्वाधिक भ्रष्ट देश !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे !

‘कोरोना’रूपी भ्रष्टाचार !

लाचखोरी आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रामाणिक लोकांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजमनावर धर्मशिक्षणाचे संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी संघटित होऊन याविरोधात लढा दिला, तर यश मिळू शकते, तसेच अशा लढ्याला ईश्‍वरी अधिष्ठान असेल, तर यश निश्‍चित !

सिंधुदुर्ग आर्.टी.ओ. कार्यालयातील वाहन कर घोटाळा प्रकरणी ५ कर्मचारी निलंबित

भारतातील प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचार सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !

मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात आल्यानंतर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता समोर आली. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आर्थिक लुबाडणूक चालू आहे. देवतेचे दर्शन ही विकत घेण्याची गोष्ट नसल्याने ‘पेड दर्शना’ला भाविकांचा कायम विरोधच राहिला आहे !

भारताची लज्जास्पद स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.

लालूप्रसाद यादव कारागृहातून बिहार सरकार पाडण्याचा कट रचत आहेत ! – भाजपचा आरोप

बिहार सरकारने या आरोपाची चौकशी करावी आणि जर हे सत्य असेल, तर लालूप्रसाद यादव यांना कारागृहात भ्रमणभाष संच कसा उपलब्ध झाला, याचाही शोध घेऊन संबंधितांना आजन्म कारागृहात डांबावे !

महाराष्ट्रात लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे सर्वाधिक प्रलंबित खटले पुण्यात

गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. यावर सरकारने तात्काळ उपाययोजना काढावी, ही अपेक्षा !