भ्रष्टाचारग्रस्त भारत !
कोल्हापूर – एका आधुनिक वैद्यांकडून धाड न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतांना प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण यांना लक्ष्मीपुरी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.
शहरातील एका आधुनिक वैद्यांच्या विरोधात एका व्यक्तीने प्राप्तीकर विभागाकडे तक्रार दिली होती. याच्या अनुषंंगाने संबंधित आधुनिक वैद्यांचे अन्वेषण चालू होते. अन्वेषणाच्या कालावधीत घरावर धाड न टाकण्यासाठी चव्हाण यांनी संबंधित आधुनिक वैद्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. शेवटी हा व्यवहार १४ लाख रुपयांवर ठरला. ठरलेल्या रकमेपैकी १० लाख रुपये १८ डिसेंबर या दिवशी घेण्याचे ठरले. ही रक्कम घेतांना चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चव्हाण यांना कह्यात घेतले आहे.