राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २०.१२.२०२०

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

पू. (अधिवक्ता) कुलकर्णी यांनी पत्र पाठवले नसते, तर सरकारने कारवाई केली नसती !

‘तुळजापूर देवस्थान समितीतील घोटाळ्याच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेने उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेनंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने झालेल्या अन्वेषणात या घोटाळ्यात शासनाचे ४२ अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे समोर आले. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून त्यात अपहृत भूमी, दानपेट्यांचा लिलाव, तसेच सोने, चांदी यांचा समावेश होता; मात्र गेली ३ वर्षे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या अन्वेषणावर पुढे काय झाले ते कळले नाही, तसेच हा अहवालही समोर आला नाही. तरी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने केलेल्या अन्वेषणाचा अहवाल घोषित करावा, तसेच दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. त्यावर ‘आपला ‘ई-मेल’ मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी गृह विभागाच्या अपर सचिवांकडे पाठवण्यात आला आहे’, असे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे.’


ब्युरोने नुसती माहिती उघड करणे अपेक्षित नाही, तर उत्तरदायी पोलिसांवर दावे लावणे अपेक्षित आहे !

‘गोव्यात विदेशी नागरिकांच्या विरोधात जेवढे गुन्हे पोलिसांत नोंद झाले आहेत, त्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष केलेले गुन्हे ५ पटींनी अधिक आहेत, अशी माहिती ‘नॅशनल क्राईम् रेकॉर्ड ब्युरोच्या वर्ष २०१९ मधील नोंदींच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.’


जे हॉटेल व्यावसायिक असोसिएशनला कळते, ते सरकारला कळत नाही !

‘गोव्यातील लघु आणि मध्यम हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने राज्यातील  अनधिकृत हॉटेलांमुळे सरकारचा ३०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप केला आहे. नुकतेच या संघटनेचे अध्यक्ष सेराफिन कोता यांनी याविषयी म्हटले की, ६० टक्के विदेशी नागरिकांना प्रत्यागमन उड्डाणांद्वारे (रिपेट्रीएशन फ्लाईट्सद्वारे) राज्याबाहेर स्थलांतरित करण्यात आले, ते सर्व अनधिकृत हॉटेलांमध्ये निवास करत होते.’


‘गायचोर’ असे आडनाव पालटत का नाही ? त्याच्यामुळे मुलांवर काय संस्कार होतील ? किती पाप लागेल ?

‘३१ डिसेंबर २०१७ या दिवशी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांची पाठराखण करणार्‍या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी असलेल्या आणि जमावाला भडकावल्याच्या आरोपाखाली कबीर कला मंचचे सागर गोरखे अन् रमेश गायचोर यांना कह्यात घेतले आहे.’


धर्मांधांचे राज्य भारतावर आले, तर सर्वत्र असेच होईल !

‘पाकमधील सत्ताधारी पक्ष ‘तहरीक-ए-इंसाफ’च्या खासदार शंदाना गुलजार यांनी म्हटले आहे की, ‘देशातील ८२ टक्के बलात्काराच्या घटनांत पीडितेच्या घरातीलच सदस्य, उदा. वडील, भाऊ, आजोबा किंवा काका हे तिच्यावर बलात्कार  करतात.’ त्या एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलत होत्या.’


स्वतःच्या पक्षातील भ्रष्टाचार ओळखता न येणारे समाजातील भ्रष्टाचार कधी ओळखू शकेल का ?

उत्तरप्रदेश राज्यात ६९ सहस्र शिक्षकांच्या भरती प्रक्रियेमध्ये प्रश्‍नपत्रिका उघड करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भाजपचे माजी मंत्री चंद्रमासिंह यादव यांना विशेष कृती दलाने प्रयागराज येथून अटक केली. चंद्रमा यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये असणार्‍या परीक्षा केंद्रातून फसवणूक करणार्‍यांना प्रश्‍नपत्रिका पुरवल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यापूर्वी चंद्रमा हे योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर होते; मात्र जानेवारी २०२० मध्ये टी.ई.टी. परीक्षांच्या संदर्भातील घोटाळ्यांच्या प्रकरणात अटक करण्यात आल्यावर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले होते.’