सावधान ! देवस्थानांच्या भूमी कुणाच्या घशात ? सरकारी मसुदा कि मंदिरांच्या अस्तित्वावर घाला ?
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने देवस्थान इनाम (बक्षीस अथवा दान) भूमींचे हस्तांतरण आणि मालकी हक्क कुळ किंवा वहिवाटदारांच्या नावे करणे यांविषयी जो नवीन मसुदा सिद्ध करून जे संकेत दिले आहेत, ते पहाता हिंदु देवस्थानांच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.