Humayun Kabir Suspended : बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर पक्षातून निलंबित
ममता बॅनजी यांना कबीर यांची कृती पसंत नव्हती, तर त्यांनी त्यांना तात्काळ पक्षातून काढून का टाकले नाही ? कबीर यांचे आता निलंबन करणे, म्हणजे ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’, असेच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?