भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याचा दुष्परिणाम !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – बाबरी ढाचाचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप यांचे कौतुक करणे महागात पडले. त्यांनी सरकारच्या बाजूने युक्तीवाद केल्याने संतप्त झालेल्या मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. शुक्रवार, ५ एप्रिल या दिवशी ते मशिदीत नमाजपठणासाठी गेले असता त्यांना मुसलमानांकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र पांडे यांनी सांगितले की, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाई करण्यात येत आहे.
या घटनेविषयी इक्बाल अन्सारी म्हणाले की, काही लोकांना देशात ‘शांतता नसावी’ अशी इच्छा आहे. यामुळे त्यांना समाजातील वातावरण बिघडवण्यासाठी देणग्या मिळत रहातील. अशा लोकांवर प्रभावी कारवाई झाली पाहिजे.