
पुणे – स्वारगेट बसस्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नादुरुस्त आणि आयुर्मान संपलेल्या बस १५ एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पी.एम्.पी.एम्.एल्.) स्वमालकीच्या ४६ नादुरुस्त बस मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या बसच्या सुट्या भागांची लिलावातून विक्री करण्यात येणार आहे. लिलावातून अनुमाने दीड कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे पी.एम्.पी.च्या अधिकार्याकडून सांगण्यात आले.