महाराष्ट्र : ५ वर्षांत २ सहस्र ७६४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होऊनही घुसखोरी थांबेना !

देशभरात ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर असून एकूण आकडा पहाता ही आकडेवारी ०.००५ टक्के आहे. याने घुसखोरीला लगाम कसा लागू शकेल ?

उत्तराखंडमध्ये ५०० हून अधिक बेकायदेशीर मदरशांना ठोकण्यात येणार टाळे

एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मदरसे चालू होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? केंद्रात आणि १८ राज्यांत भाजपचे सरकार असल्याने आता सर्वत्रच अशी कारवाई झाली पाहिजे !

HOLI Row In AMU : ‘अनुमती मिळो किंवा न मिळो, १० मार्चला विश्‍वविद्यालयात होळी खेळली जाईल !’

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय केंद्र सरकारच्या अनुदानावर चालते. येथे ईदनिमित्त कार्यक्रम सादर होत असतील, तर हिंदूंचेही सणांचे कार्यक्रम सादर झाले पाहिजेत. जर होत नसतील, तर ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारने विश्‍वविद्यालयाचे अनुदान बंद केले पाहिजे !

औरंगजेबाच्या नावाने भरणार्‍या उरूसावर त्वरित बंदी आणून त्याचे उदात्तीकरण करणारा फलक काढावा ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

औरंगजेबाच्या नावे भरणार्‍या उरुसाच्या दिवशी देण्यात येणारी सुटी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचा अवमान होय !

मुलांना उत्तम संस्कार देऊन राष्ट्राचे आदर्श नागरिक घडवणे काळाची आवश्यकता ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्च न्यायालय

या वेळी ‘श्रीराम राधाकृष्ण मेमोरियल ट्रस्ट’च्या वतीने गरजू विधवा, एकल पालक आणि अनाथ मुले अशा १३६ जणांना प्रत्येकी १२ सहस्र असे एकूण १६ लाख ३२ सहस्र रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.

अनधिकृत होर्डिंगमुळे तुर्भे आणि वाशी परिसर विद्रूप !

अशा प्रकारे सवंग प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांवर नवी मुंबई महापालिका कारवाई का करत नाही ?

Gutkha Banned In Up Assembly Premises : उत्तरप्रदेश विधानसभा परिसरात पान मसाला आणि गुटखा यांवर बंदी !

पान मसाला खातांना आढळणार्‍यास १ सहस्र रुपयांचा होणार दंड

Iftar Party At British Parliament : ब्रिटनची संसद आणि राजघराण्याचा प्राचीन किल्ला येथे प्रथमच आयोजित करण्यात आली इफ्तारची मेजवानी !

ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत घट होऊन मुसलमानांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने तेथेही राजकारण्यांकडून मुसलमानांचे लांगूलचालन केले जात आहे आणि ही घटना त्याचेच निदर्शक आहे !

Madras HC On Caste Claim On Temple : कोणतीही जात मंदिराच्या मालकीवर दावा करू शकत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

अरुलमिघू पोंकलियाम्मन् मंदिराचे प्रशासन अरुलमिघू मरीअम्मन्, अंगलाम्मन् आणि पेरुमल या मंदिरांच्या गटांपासून वेगळे करण्याच्या शिफारसीला मान्यता देण्यासाठी ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागा’ला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

MP Waqf Claims Makhani Village : मध्यप्रदेशातील हिंदुबहुल माखानी या गावाच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

पुढे ‘संपूर्ण भारतभूमी ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, औरंगजेबाने ती दान दिली आहे’, असे वक्फ बोर्डने म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !  ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यातच देशहित आहे !